Sambhajinagar News: परदेशी तरुणासोबतची मैत्री पडली महागात, विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा; नेमकं काय घडलं?

Married Woman Cheated Of 17 Lakhs: संभाजीनगरमधील महिलेला परदेशी तरुणासोबतची मैत्री महागात पडली आहे. महागड्या वस्तू गिफ्ट देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे.
Sambhajinagar News: परदेशी तरुणासोबतची मैत्री पडली महागात, विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा; नेमकं काय घडलं?
Married Woman Cheated Of 17 LakhsSaam Tv
Published On

रामू ढाकणे, संभाजीनगर

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण-तरुणींची फसवणूक केल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करत छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहित महिलेला तब्बल १७ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या महिलेला परदेशी तरुणासोबतची मैत्री महागात पडली आहे. महागड्या वस्तू गिफ्ट देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar News: परदेशी तरुणासोबतची मैत्री पडली महागात, विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा; नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar News : न्याय मिळेना! स्वातंत्र्यदिनीच २ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; कोल्हापूर, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा असल्याचे सांगून एका तोतयाने संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. संभाजीनगर शहरातील एका ३१ वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवर मैत्री करून तिला तब्बल १७ लाख ६९ हजार रुपयांचा गंडा घातण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar News: परदेशी तरुणासोबतची मैत्री पडली महागात, विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा; नेमकं काय घडलं?
Sambhajinagar News : संभाजीनगर शहरात रोज १ हजार डेंगू सदृश्य तर १० हजार हिवतापाचे रुग्ण; डास निर्मूलन कागदावरच

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. ही उच्चशिक्षित महिला सध्या एका समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळेच्या वस्तीगृहाची अधीक्षक आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये ही महिला आणि परदेशी तरुणासोबत मैत्री झाली होती. त्यानंतर या तरुणाने महिलेचा विश्वास जिंकला आणि तिला सोने चांदीच्या भेटवस्तू पाठवण्याचे नाटक करून १७ लाख ६९ हजार रुपये उकळले.

Sambhajinagar News: परदेशी तरुणासोबतची मैत्री पडली महागात, विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा; नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar: बदला आणि संपत्तीसाठी काकू बनली भक्षक; एकुलत्या एक पुतण्याला फेकले विहिरीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com