Cyber Crime News : सायबर गुन्हेगारांच्या रडारवर अधिकारी; आतापर्यंत आठ अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते, केली पैशांची मागणी

Sambhajinagar News सायबर गुन्हेगारांच्या रडारवर अधिकारी; आतापर्यंत आठ अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते, केली पैशांची मागणी
Cyber Crime News
Cyber Crime NewsSaam tv

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर  : गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच आता सायबर भामट्यांकडून आयएएस, आयपीएस (Sambhajinagar) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाउंट (Cyber Crime) उघडून त्याद्वारे पैशाची मागणी करून फसवणूक करण्यात येत असल्याचे उघड केस आले आहे. सायबर पोलिसांकडे या प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. (Tajya Batmya)

Cyber Crime News
Ahmedabad Fire News: अहमदाबादमध्ये अग्नितांडव; १०० हून अधिक रुग्ण असलेल्या रुग्णालयाला भीषण आग

सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत सामान्य माणसांना लुबाडल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र आता या गुन्हेगारांनी पुढचे पाऊल टाकत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना टार्गेट केले आहे. आयएएस, आपीएस अधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियात डमी खाते उघडून त्या आधारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते उघडून मेसेजच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत करणे वस्तू विक्रेते आमिष दाखवून पैशांची मागणी करणे अशा या ट्रिक्स आहेत.

Cyber Crime News
Ahmednagar Crime News : युवकांनी दुचाकीवरून येत बस थांबविली; बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना केली मारहाण

अशा प्रकारे होते फसवणूक
बड्या अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाऊंट उघडून, त्यांच्या मित्राचे जुने फर्निचर खरेदी करण्यासंदर्भात सुचवलेले असल्याचा भास होऊन या अधिकाऱ्यांच्या संबंधित व्यक्ती कुठलीही खातरजमा न करता व्यवहार करण्यास धजवतात. तो कठीत सीआरपीएफ अधिकारी संपर्क करून डील करतो त्यानंतर ५० टक्के रक्कम ऍडव्हान्स मागतात. ऍडव्हान्स जमा झाल्यानंतर एक खोटी पावती तयार करून पाठवतात. ही पावती पाहून वस्तू घेणाऱ्यांचा थोडासा विश्वास वाटतो. मात्र ते फर्निचर कधीच मिळत नाही. गाडीला टोल किंवा अन्य कारणे दाखवत अजूनच पैसे उकळत राहतात. यानंतर काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांकडे वळतात.

Cyber Crime News
Jalna Fraud Case : जालन्यात दोन कंपन्यांची व्यापऱ्यांकडून साडेतीन कोटीची फसवणूक

या बड्या अधिकाऱ्यांचे डमी अकाउंट्स
छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, लोहमार्ग अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी अधिकाऱ्यांच्या नावे आतापर्यंत सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करण्यात आलेले आहेत. यातच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या नावाने तर चौथ्यांदा डमी अकाउंट बनवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com