Ahmednagar Crime News : युवकांनी दुचाकीवरून येत बस थांबविली; बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना केली मारहाण

Ahmednagar News युवकांनी दुचाकीवरून येत बस थांबविली; बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना केली मारहाण
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime NewsSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगर शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. नगर शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडलेत का काय असाच प्रश्न आता समोर येतोय. (Ahmednagar) अहमदनगर- पुणे महामार्गावरील केडगाव परिसरात एक एसटी बस (St Bus) थांबून त्या बसमधील दोन मुलींना मारहाण करत पळूवून नेल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे गुंडांना कोणाचीही भीती राहिली नसल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime News
Yavatmal Accident News: भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; कर्तव्य बजावत असातना पोलिसाचा जागीच मृत्यू

बसमधील प्रवाशांनी सांगितलेली माहितीनुसार पुणे बस स्थानकावरून दोन मुली व एक मुलगा बसमध्ये बसले होते. ही बस जेव्हा पुणे स्टॅन्डवरून पुण्याकडे रवाना झाली. त्यावेळी नगर- पुणे महामार्गावरील केडगाव परिसरातील निशा पॅलेस हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर काही तरुण दुचाकीवरून येत त्यांनी बसला गाडी आडवी लावून बस अडवली. तीन युवकांनी बसमध्ये प्रवेश करून बसमध्ये बसलेल्या मुलींना मारहाण (Crime News) करत खाली उतरून घेऊन गेले. यावेळी प्रवाशांनी त्यांना विरोध केला. मात्र प्रवाशांना त्या तरुणांनी शिवीगाळ केली. 

घरातील मॅटर असल्याचे सांगत घेऊन गेले 

जे प्रवासी बस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा असे सांगत होते. त्या प्रवाशांना हा आमच्या घरातील मॅटर आहे. तुम्ही मधे पडू नका; असे जोरजोराने ओरडत तरुणांनी मुलींना ओढत घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र त्या मुली कोण होत्या (Police) आणि ते तरुण कोण होते. याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. ही घटना घडल्यानंतर बस ड्रायव्हरने बस थोड्या अंतरावर निघून थांबवली होती.

Ahmednagar Crime News
Pune Terrorist News Update: पुणे दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट, आरोपींच्या घरातील पंख्यात सापडलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

पोलिसात तक्रार नाही 
याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पोलीस याबाबत प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौकशी करत आहेत. नेमकी ही घटना कोणी केली व कोणत्या कारणातून झाली? याबाबत पोलीस प्रशासन आता तपास करत आहे. मात्र या प्रकरणामुळे बस अनेक तास एकाच जागेवर उभी करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झाला. मात्र अनेक प्रवाशांनी या घटनेचा संताप व्यक्त करत महाराष्ट्रमध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com