रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : कर थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी संभाजीनगर महापालिकेने नियोजन आखले आहे. आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट ठेवत शहरातील मोठ्या थकबाकीदारांना नोटीस देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील पाच महिन्यात मालमत्ता कर व पाणीपट्टीतून ८६ कोटी १३ लाखांची वसुली करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये तिजोरीत आले पाहिजे; असे नियोजन आखले आहे. या दृष्टीने नियोजन देखील केले आहे. त्यामुळे १ एप्रिल पासून मालमत्ता कर पाणीपट्टी आणि थकबाकीवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. त्याबरोबरच मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना आता जप्तीच्या नोटीस देण्यास सुरुवातही केली आहे. नोटीस बजावत थकबाकी भरण्याचा अल्टिमेटम देण्यात येत आहे. यामुळे काही थकबाकीदारांकडून कराची रक्कम भरली जात आहे.
नवीन मालमत्ता करांचे देखील सर्व्हेक्षण
मागील ५ महिन्यात प्रशासनाने ७३ कोटी ७१ लाख रुपये मालमत्ता करातून तर १२ कोटी ४२ लाख रुपये पाणीपट्टीवरच्या माध्यमातून वसूल केले. दरम्यान नवीन मालमत्तांचे देखील आता सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यासाठी ३५ कनिष्ठ अभियंते सर्वेक्षणासाठी नियुक्त केले आहेत. तर थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.