Sambhaji Nagar Protest: अखेर सात तासानंतर संभाजीनगरमधील आंदोलन मागे, ठेवीदारांच्या मागण्यावर आयुक्त म्हणाले...

Sambhaji Nagar Protest: विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेलं ठेवीदारांचं आंदोलन अखेर सात तासाच्या प्रतिक्षेनंतर मागे घेण्यात आलं आहे. दुपारी दीड वाजता हे आंदोलन सुरू झालं होतं मात्र आयुक्त कार्यालयातून कोणीही चर्चेसाठी आलं नसल्याने ठेवीदार विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात घुसले आणि विभागीय आयुक्तांनी भेटण्याचा आग्रह धरला होता.
Sambhaji Nagar Protest
Sambhaji Nagar ProtestSaam Digital
Published On

Sambhaji Nagar Protest

विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेलं ठेवीदारांचं आंदोलन अखेर सात तासाच्या प्रतिक्षेनंतर मागे घेण्यात आलं आहे. दुपारी दीड वाजता हे आंदोलन सुरू झालं होतं मात्र आयुक्त कार्यालयातून कोणीही चर्चेसाठी आलं नसल्याने ठेवीदार विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात घुसले आणि विभागीय आयुक्तांनी भेटण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप आलं होतं.

तब्बल अडीच ते तीन तास विभागीय आयुक्त आंदोलकांना भेटायला बाहेर आले नाहीत. मात्र मुंबईवरून विभागीय आयुक्तांना सांगण्यात आलं आणि अखेर विभागीय आयुक्त बाहेर आले. आंदोलकांना तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं. त्यानंतर ठेवीदार परतले. दरम्यान सरकारने आताही आश्वासन दिले काही दिवस वाट पाहू अन्यथा मुंबईत जाऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी ठेवीदारांनी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhaji Nagar Protest
Shiv Sena Court News: ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर; लोकसभेची आचारसंहिता लागली तर कोणाला होईल फायदा? जाणून घ्या

संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्था , ज्ञानोबा अर्बन सोसायटी , मलकापूर बँक अशा तीन ते चार बँका आणि पतसंस्थामध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. जुलै २०२३ मध्ये आदर्श बँकेत मोठा घोटाळा झाला होता. व्यवहारांमध्ये तब्बल २०० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेच्या संचालक मंडळाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावे कर्ज काढून बँकेचं २०० कोटींचं नुकसान केल्याची तक्रार झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र ठेवीदारांच्या पैशाचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

Sambhaji Nagar Protest
Chandrapur News: विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव, मुख्याध्यापकाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com