Shiv Sena Court News: ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर; लोकसभेची आचारसंहिता लागली तर कोणाला होईल फायदा? जाणून घ्या

Shiv Sena Court News: निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी महिनाभर लांबणीवर पडली आहे.
Shiv Sena Court News
Shiv Sena Court NewsSaam Digital
Published On

Shiv Sena Court News

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी महिनाभर लांबणीवर पडली आहे. १ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर हे प्रकरण बराचकाळ लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपसोबत शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. त्याविरोधात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यासह इतर मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा आध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena Court News
Manoj Jarange Patil: 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. यापूर्वी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर केला आहे. मात्र निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय शिंदेच्या बाजूने दिला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुका तोंडावर असून आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे त्याआधी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय लागला असता तर निवडणुकीची पुढची रुपरेषा ठरवता आली असती. मात्र ही सुनावणीही लांबणीवर पडल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Shiv Sena Court News
Maharashtra Fort : शिवप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील ११ गडकिल्ल्यांचा नामांकनासाठी UNESCO कडे प्रस्ताव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com