Manoj Jarange Patil: 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Manoj Jarange on Reservation: मनोज जरांगे यांनी रायगड दौऱ्यावर असताना सरकारच्या आरक्षणावरील भूमिकेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'सरकार दोन भूमिका घेतंय? असा सवाल मनोज जरांगे यांनी शिंदे सरकारला केला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

Manoj Jarange Patil News:

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. शिंदे सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी रायगड दौऱ्यावर असताना सरकारच्या आरक्षणावरील भूमिकेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच '10 फेब्रुवारीपासून उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे हे सध्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला. मनोज जरांगे म्हणाले, 'सरकारने सगेसोयरेविषयीची अध्याधेशाची अंमलबजावणी केली पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र वाटप व्हायला पाहिजे. ते झाले नाहीत. हरकती येईपर्यंत हे तातडीने केलं पाहिजे. या अध्याधेशाचं १५ दिवसांत कायद्यात रुपांतर केलं पाहिजे'. (Maratha Reservation)

Manoj Jarange Patil
Maharashtra Fort : शिवप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील ११ गडकिल्ल्यांचा नामांकनासाठी UNESCO कडे प्रस्ताव

'अध्यादेशातील अंमलबजावणी केली नाही तर १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार आहे. सर्वांना विचारून हा निर्णय घेतला आहे. आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलं आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करत आहोत. समितीला मुदतवाढ देऊनही काम करत नाही. त्यामुळे ज्याची कुणबी नोंद मिळाली, त्यांना प्रमाणपत्र वाटप केलं पाहिजे. या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे जरांगे यांनी जाहीर केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Maharashtra Politics : कन्फर्म! महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड; 'वंचित'ची अखेर महाविकास आघाडीत एन्ट्री

'आम्हाला सरकारची भूमिका कळत नाहीये. दुसरीकडे हैदराबादचं गॅझेटची माहिती घेतली. सगेसोयऱ्यांच्या कायद्याची प्रक्रिया झालेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com