Maharashtra Fort : शिवप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील ११ गडकिल्ल्यांचा नामांकनासाठी UNESCO कडे प्रस्ताव

Fort Of Shivaji Maharaj World Heritage: महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे.
Maharashtra Fort News
Maharashtra Fort NewsSaam Digital
Published On

Fort Of Shivaji Maharaj UNESCO

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेलं शौर्य, पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केलं. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये (World Heritage List) नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Fort News
Maharashtra Politics : कन्फर्म! महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड; 'वंचित'ची अखेर महाविकास आघाडीत एन्ट्री

याविषयी सांगताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांचा पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

कोणत्या गड-किल्ल्यांचा समावेश?

1) साल्हेर (Salher fort)

2) शिवनेरी (shivneri fort)

3) लोहगड (Lohagad)

4) खांदेरी (Khandheri)

5) रायगड (raigad fort)

6) राजगड (Rajgad Fort)

7) प्रतापगड (pratapgarh fort)

8) सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)

9) पन्हाळा (panhala)

10) विजयदुर्ग (vijaydurg fort)

11) सिंधुदुर्ग (sindhudurg fort)

Maharashtra Fort News
Maharashtra Politics: उद्योगमंत्री उदय सामंतांचे बंधू काँग्रेसच्या वाटेवर? विजय वड्डेटीवारांची घेतली भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com