Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत घरांवर महापालिकेचा हातोडा, नागरिकांचा आक्रोश; पोलीस आणि स्थानिकांमध्ये जोरदार राडा

Municipal Corporation Demolished Illegal Houses: छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी विश्रांती नगर परिसरात 200 अनधिकृत घरं होती. त्याच्यावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar NewsSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे

Municipal Corporation Demolished Illegal Houses

छत्रपती संभाजीनगर (Sambhaji Nagar) शहरातील मुकुंदवाडी विश्रांती नगर परिसरात 200 अनधिकृत घरं होती. अनेक लोकं पत्र्याचे शेड बांधून त्या ठिकाणी राहत होते. या घरांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला आहे. दगडफेकीत काही महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत.  (latest marathi news)

छत्रपती संभाजी नगर शहरालगत मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसर आहे. विश्रांती नगर भागात तब्बल 200 अनधिकृत घरे ( Illegal Houses) होती. पत्र्याचे शेड बांधून त्या ठिकाणी नागरिक राहत होते. मात्र, काही घरांमध्ये अनधिकृतपणे दारू विक्री करण्यात येत होती. त्यामुळे या परिसरामध्ये गुंडगिरी, लुटमारी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार राडा

याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आज सकाळी 9 वाजता पोलीस आणि अतिक्रमण पथक कारवाईसाठी (Municipal Corporation) दाखल झाले होते. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांची समजूत घातली. परंतु, नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

स्थानिक नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी समजूत घालूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत (Sambhaji Nagar Municipal Corporation) नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अखेर हा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. नागरिकांवर लाठीचार्ज केला. अश्रू धुराच्या नळकांडे देखील फोडल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध केला.

Sambhaji Nagar News
Ahmednagar Crime : सोनई अत्याचार प्रकरण; महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमणाची कारवाई

स्थानिकांनी आक्रमकपणे पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने अतिक्रमणाची कारवाई (Municipal Corporation Demolished Illegal Houses) सुरू केली आहे. या भागातील अनधिकृत पत्र्यांचे घरे जमीनदोस्त केले आहेत.

महानगरपालिकेच्या अतिक्रमणानंतर अनेक लोकं बेघर झाली (Sambhaji Nagar News) आहेत. यावेळी त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला.

Sambhaji Nagar News
Pune Crime News: पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे 'दिल्ली' कनेक्शन; पोलिसांच्या छापेमारीत ४००० कोटींचे अमली पदार्थ जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com