Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये दगडफेक, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवलं; अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

Encroachment In Vishrantnagar : ही कारवाई हाेऊ नये यासाठी स्थानिकांनी केलेल्या प्रयत्नांना प्रशासनाने न जुमानता काही ठिकाणचे अतिक्रमण उद्धवस्त करुन टाकले.
stone pelting incident vishrant nagar while removing encroachment chhatrapati sambhajinagar
stone pelting incident vishrant nagar while removing encroachment chhatrapati sambhajinagarsaam tv
Published On

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर येथील विश्रांत नगर भागात आज (बुधवार) अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिका प्रशासनाच्या पथकासह पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी स्थानिकांनी गोंधळ घालत कारवाई थांबविण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फाेडत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु ठेवली. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर येथे अतिक्रमण काढण्यासाठी आज महापालिका प्रशासन पोलिसांच्या फौज फाट्यासह दाखल झाले हाेते. यावेळी स्थानिक नागरिकांनी कारवाईस विरोध दर्शविला. नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.

stone pelting incident vishrant nagar while removing encroachment chhatrapati sambhajinagar
Sharad Pawar : काही गोष्टींबाबत सरकारने समंजस भूमिका घ्यायची असते, असं का म्हणाले शरद पवार? (पाहा व्हिडिओ)

यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने समावेश हाेता. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 जेसीबी, अग्निशामक दलाच्या गाड्या सोबतच पोलीस प्रशासनाने देखील दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी हाेते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे देखील घटनास्थळावर हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही कारवाई हाेऊ नये यासाठी स्थानिकांनी केलेल्या प्रयत्नांना प्रशासनाने न जुमानता काही ठिकाणचे अतिक्रमण उद्धवस्त करुन टाकले.

Edited By : Siddharth Latkar

stone pelting incident vishrant nagar while removing encroachment chhatrapati sambhajinagar
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com