Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाहनाचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवले. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मिरज विधानसभा क्षेत्रातील एकही कार्यक्रम घेऊ नये. सर्व कार्यक्रम रद्द करावेत अन्यथा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने पालकमंत्री खाडे यांना दिला. (Maharashtra News)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाज यांच्यावतीने राज्यभरात आंदोलन सुरू आहे. विविध जिल्ह्यात मराठा समाज आंदोलनाची तीव्रता वाढवत आहे. बहुतांश ठिकाणी गनिमी काव्याने मंत्र्यांच्या गाड्या अडवून मराठा आरक्षणसाठी काय केले हा प्रश्न समाज बांधव विचारु लागले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज (शनिवार) सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा ताफा सांगली कडून मिरजेकडे येत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून वंड मोरे कॉर्नर येथे पालकमंत्र्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवले. अचानक घटना घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गाडीतून उतरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही काय केले असा प्रश्न मराठा समाजाने परखडपणे पालकमंत्री सुरेश खाडे यांना विचारला.
सांगली जिल्हातील मराठा समाज आक्रमक झाला असून आता गनिमी काव्याने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मिरज तालुक्यातील राजकीय सर्व पक्षाचे कार्यक्रम होऊ देणार नाही. जर कार्यक्रम सुरू केले तर उधळून लावू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई यांनी दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.