Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणामुळे संत गजानन महाराज मंदिर, शनैश्वर मंदिर राहणार बंद, जाणून घ्या दर्शनाच्या वेळा

प्रत्यक्ष चंद्रग्रहण रात्री १:०५ मिनिटांनी सुरू होणार असून रात्रीच २:३० वाजता ग्रहण सुटेल.
Chandra Grahan 2023
Chandra Grahan 2023saam tv
Published On

Chandra Grahan 2023 : आज (शनिवार) चंद्रग्रहण असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी काही बदल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. आज दुपारी साडे तीन वाजल्यापासून ग्रहणाचे वेध सुरू होणार आहेत.(Maharashtra News)

Chandra Grahan 2023
Sharmila Thackeray News : ...तर तुमची बायकाेच तुमचे लाेणचे करेल : शर्मिला ठाकरे

शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर समितीच्या सूचना

१) मंदिर दर्शनासाठी खुले राहील मात्र भाविकांना जाळीतून दर्शन घ्यावे लागेल.

२) सूर्यास्ताची आरती होणार नाही .

३) मंदिर परिसरातील महाप्रसादाचे वाटप दुपारी ३:०० वाजेपासून बंद राहिल मात्र मंदिरा बाहेरील प्रसादालय व अल्पोहाराचे कक्ष सुरू राहतील.

प्रत्यक्ष चंद्रग्रहण रात्री १:०५ मिनिटांनी सुरू होणार असून रात्रीच २:३० वाजता ग्रहण सुटेल त्यामुळे रविवारी सकाळी पूर्ववत मंदिर भाविकांसाठी सुरू राहील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandra Grahan 2023
Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज सातारकरांचे स्मारक राज्य सरकार उभारेल : देवेंद्र फडणवीस

साता-यातील शनेश्वर मंदिर सायंकाळी राहणार बंद

दरम्यान सातारा शहरातील शनिवार पेठेतील शनि मारुती देवस्थान ट्रस्टने देखील मंदिराच्या वेळेतील बदल कळविले आहे. चंद्रग्रहण असल्याने वेदांचे नियम पाळायचे असल्याने श्री शनेश्वर महाराज यांची सायंकाळची महाआरती ठीक ७.०० वाजता होईल.

या मंदिरामध्ये सायंकाळी ७.०० वाजता नंतर पूजाआर्चा, पुजासाहित्य, प्रसाद , हार इत्यादी वस्तू अर्पण करू नये व ते स्विकारले ही जाणार नाहीत. महाआरती झाल्यानंतर साडे सात वाजता मंदीर पूर्णपणे बंद होईल असे कळविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Chandra Grahan 2023
Palghar News : पेसा शिक्षक, सर्वच पद भरतीत स्थानिक बिगर आदिवासी पात्र उमेदवारांचा समावेश करा : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com