- बालाजी सुरवसे
मराठा आरक्षणाच्या (maratha reservation latest news) मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ धाराशिव येथे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या वतीने आज (मंगळवार) मराठा समाजाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्ह्यातील मराठा बांधवावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदाेलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (Maharashtra News)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव मध्ये सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.
सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील मराठा बांधवावर दाखल केलेले सर्व प्रकारचे गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी शेकडो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा धडक मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत महिलांसह युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.