Satara Crime News : पाचगणीमध्ये रिसाॅर्टवर छापा, 48 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखील पाेलिसांनी खिंगर येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला.
Crime News
Crime NewsSaam TV

Satara News :

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या पाचगणी तालुक्यातील खिंगर येथे एक रिसाॅर्टमध्ये बारबाला नाचवल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी एकूण 48 जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखील पाेलिसांनी खिंगर येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला. या ठिकाणी बारबाला नाचवल्याचा प्रकाराची माहिती पाेलिसांनी मिळाली हाेती. या छाप्यानंतर अनेकांनी आपले ताेंड लपवून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

Crime News
Satara Lok sabha Constituency : उदयनराजे भाेसले- जयकुमार गाेरेंच्या मैत्रीत लाेकसभा निवडणुक ठरणार मिठाचा खडा? चर्चांना उधाण

या प्रकरणी पाेलिसांनी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेते, डीलर अशा एकूण 35 ते 36 जणांवर गुन्हा नाेंदविला आहे. तसेच रिसाॅर्टच्या मालकास ताब्यात घेतले. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Crime News
Gram Sevak Andolan : ग्रामसेवकांचे बुधवारपासून असहकार आंदाेलन

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com