- सिद्धेश म्हात्रे
मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ आज (मंगळवार) नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत माथाडी कामगारांनी आंदोलन (mathadi kamgar andolan) छेडले. मराठा आमदारांनी तसेच अन्य आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आजच्या अधिवेशनात जाेर लावावा, आवाज उठवावा तसेच पाठिंबा द्यावा अशी मागणी माथाडी कामगारांनी राजेंद्र जुनघरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)
जुनघरे म्हणाले मराठा आरक्षणासाठी बोलावल्या विशेष अधिवेशनात (Maharashtra assembly special session 2024) सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडल्यास आम्ही त्यांना डाेक्यावर घेऊन नाचू. त्यांनी मराठ्यांची बाजू न मांडल्यास पुढील काळात माथाडी कामगार अशा आमदारांना जागा दाखवतील असा इशाराही माथाडी कामगारांनी सर्व आमदारांना दिला.
गेल्या दहा दिवसांपासून मनाेज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात उपाेषणास बसले आहे. याची दखल घेऊन आज महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बाेलावले आहे. या अधिवेशनात कायदा पारित करावा अशी मागणी सरकारकडे जुनघरेंनी व्यक्त केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.