Shirdi Sai Baba Temple: साईबाबा संस्थानचे वर्षाकाठी वाचणार 20 कोटी रुपये; कसं? जाणून घ्या संस्थानचा नवा उपक्रम

Sai Baba Temple: शिर्डीचे साईबाबा संस्थान आता वीज निर्मितीत स्वयंपूर्ण होणार आहे. दररोज लागणाऱ्या 8 मेगावॅट विजेची निर्मिती साईबाबा संस्थान स्वतः पर्यावरण पूरक अशा सोलरच्या आणि पवनचक्कीच्या माध्यमातून करणार आहे. विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणारे तीर्थक्षेत्र म्हणून साईबाबा संस्थान नावारूपाला येणार आहे.
Shirdi Sai Baba Temple:  साईबाबा संस्थानचे वर्षाकाठी वाचणार 20 कोटी रुपये; कसं? जाणून घ्या संस्थानचा नवा उपक्रम
Sai Baba Temple
Published On

सचिन बनसोड, साम प्रतिनिधी

श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक शिर्डीत येत असतात. साई समाधी मंदिर, मंदिर परिसर, भक्तनिवास, प्रसादालय, साईबाबा हॉस्पिटल अशा विविध आस्थापनांच्या विज बिलापोटी साई संस्थानला वर्षाकाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च येतो. या सर्व ठिकाणी लागणारी वीज ही महावितरण कडून घेतली जाते.

काही वर्षांपूर्वी साईबाबा संस्थानच्या मार्फत पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यासोबतच प्रसादालयाची इमारत पूर्णतः सोलर वर आधारित करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानला दररोज 8 मेगावॅट विजेची गरज लागते. मात्र सद्यस्थितीत केवळ 4 मेगावॅट विजेची निर्मिती पवनचक्की आणि सोलरच्या माध्यमातून होते. त्यामुळे उर्वरित विज वीज ही महावितरणाकडून घेतली जाते.

यासाठी वर्षाकाठी तब्बल वीस कोटींचा खर्च साईबाबा संस्थानला येतो. याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी महावितरण आणि साईबाबा संस्थानच्या बैठकीत साईबाबा संस्थान विजेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. पवनचक्कीची क्षमता वाढवणे आणि भक्तनिवास आणि रुग्णालयाच्या इमारतीवर सोलर युनिट बसून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय या बैठकीत झालाय.

पुढच्या काही दिवसात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून काम पूर्ण झाल्यावर साईबाबा संस्थानची वर्षाकाठी तब्बल 20 कोटी रुपयांची बचत होणार आहे. साईबाबा संस्थान विज निर्मितीत स्वयंपूर्ण झाल्यानंतर शहरासाठी देखील महावितरणच्या वतीने सर्वे केला जाणारा असून पूर्ण शिर्डी शहर पर्यावरण पूरक अशा सोलरवर करण्याचा मानस आहे.

Shirdi Sai Baba Temple:  साईबाबा संस्थानचे वर्षाकाठी वाचणार 20 कोटी रुपये; कसं? जाणून घ्या संस्थानचा नवा उपक्रम
Shirdi Airport : शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस; ग्रामपंचायत मालमत्ता कराचे ८ कोटी थकविले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com