मिरज पंचायत समितीत सत्तांतर; भाजपची बाजी, महाविकास आघाडीला धक्का

Sangli Politics: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदांची निवड बिनविरोध जिंकून समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Sangli Politics:
MIRAJ PANCHAYAT SAMITI POWER SHIFT: BJP TAKES CONTROL, MVA SUFFERS MAJOR POLITICAL SETBACKsaam tv
Published On
Summary
  • मिरज पंचायत समिती सभापती निवड

  • भाजपची मिरज पंचायत समितीत सत्ता

  • सांगली जिल्हा राजकारण ताज्या बातम्या

सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. यावेळी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांवर महायुतीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली. मागील निवडणुकीत बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने यावेळी राजकीय डावपेच यशस्वी करत सत्ता हस्तगत केली आहे.

Sangli Politics:
Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांचा 'गुंगी गुडीया' उल्लेख; काँग्रेसच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात राजकारण तापले

मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत यावेळी भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपाच्या राणी भोरे यांची सभापतीपदी, तर शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

Sangli Politics:
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! शिंदेंना टक्कर देणाऱ्या बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

मागील निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने प्रभावी रणनीती आखली होती.भाजपाच्या काही मित्रपक्षांना आपल्या बाजूने वळवत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले होते.मात्र विजयानंतर माजी खासदार संजयकाका पाटलांनी, खासदार विशाल पाटलांवर,जोरदार निशाणा साधला आहे.

सत्तेची समीकरण बदलले महाविकास आघाडीच्या बाजूला गेलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष ज्यामध्ये विद्यमान उपसभापती हे देखील भाजपाच्या बाजूने गेल्याचे पाहायला मिळालं,या जोरावर

नव्या निवडीत भाजपाने सत्ता हस्तगत करत मागील पराभवाचा वचपा काढला.तर महाविकास आघाडीसह खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com