रूपाली चाकणकरांचे रायगड कनेक्शननंतर राज्यात पुन्हा खळबळ; नेमके प्रकरण काय?

Rupali Chakankar Raigad Real Estate Controversy: रूपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांचे रायगडमधील बांधकाम प्रकरण राज्यात पुन्हा खळबळ निर्माण करत आहे. अल्पसंख्यांक सेलने माणगाव कोर्टात याचिका दाखल केली असून, अनधिकृत इमारत बांधकामाचा प्रकार समोर आला आहे.
Rupali Chakankar and Akash Choudhary’s Raigad construction project under scrutiny
Rupali Chakankar and Akash Choudhary’s Raigad construction project under scrutinySaam Tv
Published On

अशोक खरात प्रकरण रूपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले असून त्यांना राज्य महिला आयोगपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून देखील त्यांची हकालपट्टी केली गेली. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना देखील लक्ष केले जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Rupali Chakankar and Akash Choudhary’s Raigad construction project under scrutiny
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगडमधील रोहयात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी भागीदारीमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोहयाच्या रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे. आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टीग, कर्जत रिव्हर राफ्टीग, गीता अ‍ॅग्रो अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी, रॉक हिल अडव्हेचर रिसॉर्ट आणि कर्मा कन्स्ट्रक्शन हे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहे.

Rupali Chakankar and Akash Choudhary’s Raigad construction project under scrutiny
Rohit Pawar News। सरकारनं चर्चेसाठी यायला हवं होतं, महायुती सरकार अहंकारी

रूपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोहयातील इमारत बांधकाम प्रकरणी अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिकसुद्धा दाखल केली आहे. अनधिकृत चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची ही केस असून यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरू असल्याचा आरोपाला पुष्टी मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com