CJPच्या आंदोलनानंतर बदलत्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहात नव्या पिढिला विशेषत: 'जेन झी' आणि 'जेन अल्फा' या तरुण वर्गाला आपल्या विचारांशी जोडून घेणं प्रत्येक राजकीय पक्षाला महत्त्वाचं वाटतयं... अशातच सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपलं लक्ष जेन झी कडे वळवलयं....राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जेन झी आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधला...यावेळी त्यांना सीजेपीच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उघडपणे आंदोलनाला समर्थन दर्शवलं. तसंच व्यवस्थेत चुकल्यामुळेच आंदोलनाची वेळ आल्याचंही अधोरेखित केलं. आंदोलन देशविरोधी नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दुसरीकडे CJPच्या आंदोलनानंतर मोठ्या संख्येनं नाराज असलेल्या GEN-Z तरुणांना पुन्हा भाजपकडे वळवण्यासाठी फडणवीस सरकारनं डॅमेज कंट्रोल प्लान आखलाय... रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं 31 मार्च 2027 पर्यंत 1 हजार रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे..
GEN-Zसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन
- अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचा विस्तार
- प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती देणार
- तरुणांना तज्ज्ञ व्यक्ती आणि NGOच्या माध्यमातून समुपदेशन
- पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, बायोडाटा तयार करणं आणि संभाषण कौशल्यांवर भर
- दुसऱ्या आठवड्यात अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक
- केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व-प्रशिक्षण
- रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना 2 आठवड्यांचं कौशल्य आणि पूर्व-रोजगार प्रशिक्षण
- योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल
- नियोजन, अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना
दरम्यान जेन झीसोबत संवाद साधण्याच्या भूमिकेवर काँग्रेसनं संघ आणि भाजपवर निशाणा साधलाय...
एकीकडे संघ विचारांच्या माध्यमातून नव्या पिढीला राष्ट्रवादाशी जोडण्याचे वैचारिक प्रयत्न संघाकडून केले जात आहेत , तर दुसरीकडे हाताला काम आणि रोजगाराची हमी देऊन जेन-Z चा रोष कमी करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत... मात्र संघाचा संवाद आणि भाजप सरकारचं डॅमेज कंट्रोल जेन झींचं मन वळवण्यात यशस्वी होणार का याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.