

सिग्नलमध्ये बिघाड करून ट्रेन थांबवून दरोडा
काकीनाडा साईनगर एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री लूट
महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर दरोडेखोरांचा डोळा
विशाल शिंदे, साम प्रतिनिधी
काही दिवसापूर्वीच साताऱ्यातील कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवण्यात त्यानंतर दरोडेखोरांनी प्रवाशांकडील पैसे आणि मोबाईल लुटून नेलं होतं. अगदी तशाच प्रकारे काकीनाडा साईनगर एक्सप्रेसवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री परभणीमधील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ दरोडा पडल्याची घटना घडली.
काकीनाडा साईनगर एक्सप्रेस (१७२०६)ही गाडी परभणीकडे येत असताना चोरांनी दरोडा घातला. एक्स्प्रेस मानवत रोड येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड केला होता. त्यामुळे सिग्नलचा लाल दिवा लागल्याने ट्रेन थांबली. गाडी थांबल्यानंतर चोरटे ट्रेनमध्ये शिरले.
जनरल व एस-४ डब्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महिला प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या अंगावरील दागिने लुटले.अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवाशांकडून पैसे आणि सोने लुटल्यानंतर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
दरम्यान, सिग्नल यंत्रणा बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि यंत्रणा दुरुस्त केली. या संपूर्ण प्रकारामुळे एक्सप्रेस सुमारे ४० मिनिटे मानवत रोड स्थानकावर उभी राहिली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप कांबळे आणि जीआरपीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जोगदंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही दिवसापूर्वी साताऱ्यातील कराडमध्ये सह्याद्री एक्स्प्रेवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. त्यावेळीही दरोडेखोरांनी सिग्नलमध्ये बिघाड करत ट्रेन थांबवली होती.कोल्हापूरहून पुण्याला निघालेली सह्याद्री एक्सप्रेस शेणोली स्टेशनजवळ आली असताना एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडला होता. या ट्रेनमधील प्रवाशांकडून दरोडेखोरांनी पैसे आणि मोबाईल लंपास केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.