Rayat Kranti Sanghatana News: दूध दरासाठी 'रयत क्रांती' चे राज्यभरात आंदाेलन, ...तर दूधाला दर मिळेल: विखे-पाटील

सदाभाऊ खाेत यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर शासनाने काढलेल्या दूध दर परिपत्रकाची होळी करण्यात येत आहे.
rayat kranti sanghatana andolan for milk price in maharashtra
rayat kranti sanghatana andolan for milk price in maharashtrasaam tv
Published On

ओंकार कदम / सचिन बनसाेडे / भारत नागणे / सुशिल थाेरात

Rayat Kranti Sanghatana News :

राज्य सरकारच्या दुध दर समीतीने दुधाला 34 रूपये दर देण्याचा आदेश काढूनही दुधसंघ दर देत नसल्याने (Milk Price Issue) आज (शुक्रवार) राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जात आहे. सातारा, सांगली, पंढरपूर, नगर आदी जिल्ह्यांत आज रयत क्रांतीने आंदाेलन छेडत मागणी मान्य झाल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा दिला. (Maharashtra News)

रयत क्रांती संघटनेचे शिवथरला आंदाेलन

सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासनाच्या दुध दर दर पत्रकाची होळी करण्यात आली. शासनाने दुध दर 34 रुपये केला असताना दूध संघ 28, 29 रुपये दराने दूध खरेदी करत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना सरकारला दिला.

किसान सभेने नाेंदविला निषेध

नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी आज शासनाने दूध दराबाबत काढलेल्या आदेशाची हाेळी केली. डाॅ. अजित नवले यांनी देखील दुधाला दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगितले. आज सरकारच्या या आदेशाची किसान सभा आणि दुध उत्पादकांनी होळी करत सरकारचा निषेध केला.

rayat kranti sanghatana andolan for milk price in maharashtra
Sadabhau Khot: सदाभाऊंची राजू शेट्टींवर बाेचरी टीका, महाराष्ट्रात दूध आंदोलनाचा भडका उडेल; सरकारला दिला इशारा

पंढरपूरात आंदाेलन

गाय व म्हशीच्या दुधाला दर मिळत नसल्याने पंढरपूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. गायीच्या दूधाला प्रती लिटर 40 रूपये व म्हशीच्या दुधाला 80 रूपये भाव मिळावा या मागणीसाठी आज पंढरपूर तालुक्यात आंदाेलन करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंढेवाडी व रांझणी येथे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. यावेळी सरकारच्या अध्यादेशाचे होळी करत सरकारचा निषेध केला.

निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज : राधाकृष्ण विखे-पाटील

दूध दराबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असे म्हटले. विखे म्हणाले सध्या दुधाची आवक प्रचंड आहे.पूर्वी दूध पावडर किंवा बटरमध्ये कन्वर्जन करायचे त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्यामुळे त्याची निर्यात पूर्णपणे थांबून गेली आहे.

निर्यातीला जर आपण प्रोत्साहन देऊ शकलो आणि कन्वर्जनला जर संधी मिळाली तर भाव वाढण्यात मदत होईल. सोबतच भेसळ दुधासंदर्भात कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दूध दर वाढीसाठी मदत होईल अशी आशा विखेंनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

rayat kranti sanghatana andolan for milk price in maharashtra
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com