Kolhapur Waterfalls : गाेवा, सातारानंतर कोल्हापूरातही प्रसिद्ध धबधबा पर्यटनासाठी बंद

Panchganaga River : यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Kolhapur Waterfalls, rautwadi waterfall
Kolhapur Waterfalls, rautwadi waterfall saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur Rain Updates : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदी 36 फुटांवरून वाहत आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नदीचे विस्तीर्ण पात्र सध्या पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

Kolhapur Waterfalls, rautwadi waterfall
Ratnagiri Rain Updates : तोणदे गावात पाणी शिरलं, मगरींच्या भीतीने युवकाने काढली रात्र झाडावर (पाहा व्हिडीओ)

कोल्हापुर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (rain) कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी धबधब्याने रौद्र रुप धारण केले आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगड देखील खाली पडत आहेत.

Kolhapur Waterfalls, rautwadi waterfall
Satara Kass Road Closed : वीकेंडचा प्लॅन केला आहे, थांबा ! यवतेश्वर, कास रस्ता वाहतुकीसाठी ठेवणार आहेत बंद (पाहा व्हिडीओ)

या परिसरात येणारे पर्यटक जखमी होऊ नयेत, तसेच या परिसरात हुल्लडबाजी होऊ नये यासाठी राऊतवाडी धबधबा (rautwadi waterfall) परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. राधानगरी परिसरातील पडळी गावातच पर्यटकांना अडवण्यात येत असून पुढे सोडले जात नाही.

गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षेच्या दृष्टीने असल्याचे प्रशासनाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान काेल्हापूरप्रमाणे सातारा जिल्ह्यातील धाेकादायक ठिकाणच्या धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना प्रशासनाने मज्जाव केला आहे. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com