Ratnagiri News: दुर्दैवी! मुसळधार पावसाने कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Rain News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटनाही घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून शहरामध्ये कॉलेजची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Ratnagiri News: दुर्दैवी! मुसळधार पावसाने कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Maharashtra Rain News: Saamtv
Published On

रत्नागिरी| ता. १२ जुलै २०२४

रत्नागिरीमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून शहरामध्ये कॉलेजची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चिपळूणच्या DBJ कॉलेजमधील ही धक्कादायक घटना आहे.

Ratnagiri News: दुर्दैवी! मुसळधार पावसाने कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Pune Dam Water Storage: पुणेकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटनाही घडल्या आहेत. अशीच एक दुर्देवी घटना समोर आली असून महाविद्यालयाची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात ही घटना घडली सुशांत घाणेकर (रा. खेड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सुशांत बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडला. ज्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Ratnagiri News: दुर्दैवी! मुसळधार पावसाने कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Maharashtra Politics: मोठी बातमी! नारायण राणेंच्या 'खासदारकीला' हायकोर्टात आव्हान, विनायक राऊत यांच्याकडून याचिका दाखल; VIDEO

दरम्यान, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये पावसाचे पाणी शिरले असून या पाण्यातच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे. मात्र रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दुरुस्तीसाठी सज्जे तोडल्याने पावसाचे पाणी वॉर्डमध्ये आल्याचा दावा सिव्हिल सर्जन डॉ. अंबादास देवमाने यांनी केला आहे.

Ratnagiri News: दुर्दैवी! मुसळधार पावसाने कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
Beed Crime News: मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने तरुणाची निर्घृण हत्या, बीड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com