Ratnagiri News : लोटे एमआयडीसीतील कंपनीतून गॅस गळती, अनेकांचा दम घुसमटला; नागरिक धास्तावले

Ratnagiri MIDC News : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील आणखी एका कंपनीतून गॅस गळती झाली. या गॅस गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला.
Ratnagiri MIDC News
Ratnagiri MIDC NewsSaam TV
Published On

अमोल कलये, साम टीव्ही

रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड येथे असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील आणखी एका कंपनीतून गॅस गळती झाली. या गॅस गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. अनेकांचा दम घुसमटल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

Ratnagiri MIDC News
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, उपोषणामुळे पोटात तीव्र कळा; मराठा बांधव चिंतेत

वारंवार होणारा हा गॅस गळतीचा प्रकार प्रशासनाने थांबवावा. आमच्या आरोग्याशी खेळ करू नये, असं म्हणत नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. चाळकेवाडी आणि तीलारे वाडीतील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी थेट कंपनीच्या गेटसमोरच ठिय्या मांडला आहे.

मागील काही दिवसांपासून खेड येथे (Ratnagiri News) असलेल्या एमआयडी परिसरातील कंपन्यांमधून सातत्याने गॅस गळती होत असल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. वारंवार होणाऱ्या या गॅस गळतीची प्रशासनाने चौकशी करायला हवी, अशी विनंती नागरिक करत आहेत.

मंगळवारी रात्री देखील एक्सेल कंपनीमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. अनेकांचा दम घुसमटल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नेमकी ही गॅस गळती कशामुळे झाली? याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या गॅस गळतीविरोधात परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी कंपनीच्या गेटसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली.

Ratnagiri MIDC News
Weather Alert : छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com