Ratnagiri : १६ सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमावरून येताना भयंकर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

Ratnagiri accident returning from 16 Somvar vrat udyapan : रत्नागिरीतील मंडणगड शिरगाव परिसरात १६ सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमावरून परत येताना वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Ratnagiri accident
Ratnagiri accident Saam TV Marathi News
Published On
Summary
  • नाशिक येथील १६ सोमवार व्रताच्या उद्यापनानंतर दापोलीला परत येताना अपघात झाला.

  • मंडणगड शिरगाव परिसरात पहाटे वॅगनार कारची भीषण धडक बसली.

  • दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी असून उपचार सुरू आहेत.

  • पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे.

Ratnagiri accident News Update : सोळा सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमावरून घरी परत येताना भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आज पहाटे वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. शंकर करमरकर आणि हर्षदा जोशी यांचा मृत्यू झाला. प्रमोद मुकुंद लिमये आणि ओंकार प्रमोद लिमये हे दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रत्नागिरीत एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य केले. पोलिसांनाही याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी शंकर करमरकर आणि हर्षदा जोशी यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. अपघात का झाला? याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी जखमींचे जबाब नोदवले आहेत.

Ratnagiri accident
Zilha Parishad Elections : मोठी बातमी! ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर, वाचा कसा असेल प्रोग्राम

१६ सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमासाठी सर्वजण नाशिकला गेले होते. नातेवाईकांकडील व्रताच्या उद्यापन कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण दापोलीला परत येत असतानाच काळाने झडप घातली. घरी येताना मंडणगड शिरगाव परिसरात पहाटे भीषण अपघात झाला. यामधील दोन जखमींना तातडीने महाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा झाल्यानंतर या अपघाताची नोंद केली.

Ratnagiri accident
Local Body Election : नाशिकमध्ये ठाकरेंना जोरदार धक्का, हुकमी एक्का भाजपात प्रवेश करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com