सुप्रिया सुळेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद, दुसऱ्या खासदाराला राज्यमंत्रीपद; शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याचा प्रस्ताव, घडामोडींना वेग

Ramdas Athawale Offer To Sharad Pawar To Join NDA: शरद पवार यांनी NDA मध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, तर आणखी एका खासदाराला राज्यमंत्रीपद देण्याची ऑफर आठवले यांनी दिली.
SHARAD PAWAR NDA ENTRY
SHARAD PAWAR NDA ENTRYsaam tv
Published On: 

भरत नागणे, साम टीव्ही

देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे NDA मध्ये सामील होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच आता केंद्रीय राज्यमंत्री यांनीही शरद पवार यांना येण्याच्या विनंती केली आहे. रामदास आठवले म्हणाले, शरद पवार यांनी NDA सोबत येण्याचा निर्णय घ्यावा, ते विधेयकाला पाठिंबा देताय ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी थेट आमच्यासोबत यावे. त्यांचे 8 खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल. त्याशिवाय आणखी एका खासदाराला राज्यमंत्रीपद मिळेल. तसेच राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील मंत्रीपद दिले जातील असे मोठे विधान आठवले यांनी करत शरद पवार यांना ऑफर दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SHARAD PAWAR NDA ENTRY
मंत्रालयात पुन्हा प्रशासकीय फेरबदल! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसाद शिंदेंची शालेय शिक्षण विभागात बदली

रामदास आठवले आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केलं. संजय राऊत यांनी एका खासदाराला मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी 150 कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर उत्तर देताना आठवले यांनी संजय राऊत आमच्या बाजूने आले तरी त्यांना एक कोटी रुपयेही देणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तसेच हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता असून, त्यासाठी हिवाळी अधिवेशन किंवा तीन दिवसांचं विशेष अधिवेशन होऊ शकतं, असंही त्यांनी सांगितलं.

SHARAD PAWAR NDA ENTRY
भाजप खासदार रामराव वडकुते यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्ते ढसाढसा रडले; अखेरचा निरोप देताना पत्नीला अश्रू अनावर

दरम्यान, झेन झी पिढीमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं. अभिजित दीपके यांनी पेपरफुटी प्रकरणात केलेल्या आंदोलनाला यश मिळालं, असं ते म्हणाले. मात्र, त्यांनी अमेरिकेत 'कॉकरोच पार्टी' स्थापन केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आंदोलन करावं, अशी मिश्किल टिप्पणीही आठवले यांनी केली.

SHARAD PAWAR NDA ENTRY
Marathwada Yatra: पौष, आषाढ अन् अश्विन; तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात वर्षभरात ३ यात्रा, काय आहे महत्व?

दुसरीकडे, मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला होत असलेल्या विलंबावरही त्यांनी भाष्य केलं. स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची 350 फूट ठेवण्याची मागणी आहे. त्यामुळे पुतळ्याच्या निर्मितीला वेळ लागत असून, परिणामी स्मारकाचं काम रखडल्याचं आठवले यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.