Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड

Maharashtra Legislative Council: राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली. एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली.
Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड
Ram ShindeSaam Tv
Published On

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली.

एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली. सर्व आमदारांनी राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर राम शिंदे हे सभापती पदाच्या खुर्चीवर बसले. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपनं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड
Maharashtra Politics: नाराज छगन भुजबळ दादांची साथ सोडणार? कार्यकर्त्यांचा भाजपात जाण्याचा आग्रह

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शि्ंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड
Maharashtra Politcs : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणती खाती मिळणार? खातेवाटपाची संभाव्य यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राम शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभेतील पराभवानंतर राम शिंदे नाराज झाले होते. त्यानंतर आता त्यांची विधान परिषदेच्या सभापती पदी वर्णी लागली आहे.

Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड
Maharashtra Politics: ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार? फडणवीस-ठाकरेंची बंद दाराआड चर्चा, भेटीत नेमकं काय घडलं?

राम शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहे. ते धनगर समाजाचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. २०१४ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. यापूर्वी त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. २०१९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता.

Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड
Maharashtra Politics: ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार? फडणवीस-ठाकरेंची बंद दाराआड चर्चा, भेटीत नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com