Harihareshwar Temple: हरिहरेश्वर मंदिराचे गाभारे १८ दिवस राहणार बंद, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Harihareshwar Temple News: रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रख्यात असलेल्या श्री.हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८ दिवस बंद राहणार आहेत.
Harihareshwar Temple
Harihareshwar TempleSaam Digital

Harihareshwar Temple

रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रख्यात असलेल्या श्री.हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८ दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे (ता.१५ )फेब्रुवारी ते (ता.३)मार्चपर्यंत असे एकूण १८ दिवस करण्यात येणार.

यामध्ये श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्षनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील गाभारे बंद ठेवण्यात येणार असल्याने अभिषेक पूजा तसेच कौलप्रसाद, चंदन पुजा बंद असणार आहे. मात्र, घाटावरील विधिवत कामकाज म्हणजे येथे होणारे मरणोत्तर दिवसकार्य अस्थीविसर्जन, पिंडदान त्या संबंधित इतर कामे चालू राहतील, अशी माहिती हरिहरेश्वर न्यासाने दिली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Harihareshwar Temple
Babri Masjid Brick: बाबरी मशिदीच्या वीटेचं होणार संशोधन; भारत इतिहास संशोधन संस्थेकडून रहस्य येणार बाहेर?

बाबरी मशिदीच्या वीटेचं होणार संशोधन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेत आले होते. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर तेथून आणलेली वीट राज ठाकरेंनी संशोधन संस्थेला दिली आहे. ही वीट बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना भेट दिली होती. वीटेवर अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणत राज ठाकरेंनी ही वीट आता संस्थेला दिली आहे.

बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी आणलेली वीट राज ठाकरेंनी भारत इतिहास संशोधन संस्थेला दिली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, बाबरी पडली त्यावेळी बाळा नांदगावकर तिकडे होते. त्यावेळी त्यांनी दोन वीटा आणल्या. त्यातील एक या मंडळाला दिली आहे. या वीटा पाहा, बाबरी पडली ती काही अशीच नाही पडली. त्यावेळी बांधकामासाठी टेंडर काढत नव्हते, या वीटेवर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी संस्थेला देत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले.

Harihareshwar Temple
India Famous CM : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी आली समोर, एकनाथ शिंदे कोणत्या क्रमाकांवर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com