अलिबाग समुद्रात गुरूवारी एस डब्ल्यू कंपनीचे जहाज भरकटले होते. या जहाजावर १४ खलाशी अडकले होते. या सर्व खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तटरक्षक दलाने आज सकाळी एअरलिफ्टद्वारे त्यांची सुटका केली. या बचावकार्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. सोसाट्याचा वारा, मुसळधार पावसामध्ये देखील हे बचावकार्य करण्यात आले.
रायगडजवळच्या समुद्रात तटरक्षक दलाने थरारक मदत कार्य करत जहाजावरच्या १४ जणांचे प्राण वाचवले. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं एअरलिफ्ट करुन या सर्व खलाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जहाजाच्या अँकरमध्ये बिघाड झाल्याने हे जहाज समुद्रात भरकटले होते. वादळी वाऱ्यात मदतकार्य राबवून तटरक्षक दलाने १४ जणांना सुरक्षितरित्या समुद्र किनाऱ्यावर आणले.
जे एस डब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज गुरूवारी दुपारपासून समुद्रात भरकटले होते. अलिबागजवळ कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रात हे जहाज आले होते. याठिकाणी हे जहाज नांगरून ठेवले होते. या जहाजावर १४ खलाशी होते. खराब हवामान, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि कमी दृष्यमानता यामुळे हे जहाज भरकले होते. हे जहाज जयगड इथून साळाव इथे निघाले होते.
जहाज भरकटल्याची माहिती अलिबागच्या तहसीलदारांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी जहाज कंपनीच्या मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर बचावकार्य करण्यासाठी कंपनीची यंत्रणा आली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य करण्यात आले. पण अंधार आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. शेवटी आज सकाळी तटरक्षक दलाने एअरलिफ्टच्या सहाय्याने जहाजावरील सर्व १४ खलाशांची सुटका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.