Raigad News: रिलस्टार अन्वी कामदारच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट; पर्यटनस्थळांवर नेमकं कुठं कुठं रिल्स करण्यास बंदी?

Shooting Reels Banned In Raigad Tourist Spot: दोन दिवसांपूर्वीच रायगडमध्ये रिल बनवण्याच्या नादात ३०० फूट खोल दरीत पडून अन्वी कामदारचा मृत्यू झाला. रिल्स बनवताना तरुणांचा मृत्यू झाल्याचा घटना वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रायगड पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Raigad News
Raigad NewsSaam Tv
Published On

पावसाळ्यात अनेकजण फिरायला धबधब्यावर जातात.तरुणाई धबधब्यावर जाऊन रिल्स, व्हिडिओ, फोटो काढण्यासाठी अगदी टोकावर जातात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नुकतीच रायगडमध्ये रिलस्टार अन्वी कामदारला रिल बनवताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रायगड पोलिस प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रायगड परिसरात रिल बनवणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

रायगडमध्ये पर्यटनस्थळांवर रिल्स बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.रिल्स करताना धबधब्यावरुन किंवा दरीत पडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.नदी, धबधबे, डोंगर या परिसरात रिल्स बनवून स्टंट करणाऱ्यांवर आता प्रतिबंधणात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी रिल स्टार अन्वी कामदार हिचा रायगडमध्येच रिल काढताना मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता रायगड प्रशासनाने ठोस पाऊले उचलली आहेत. या घटना पुन्हा घडू नये त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Raigad News
Tomato Price Hike : टोमॅटो कापणार सामान्य माणसांचा खिसा; उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ

लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरातही काही दिवसांपूर्वी अन्सारी कुटुंबातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संभाजी नगरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रिल्स बनवताना वेगवेगळे स्टंट करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. या घटना घडू नये म्हणूनच पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Raigad News
MPSC: एमपीएससीमार्फत आता शिपाई पदांची भरती होणार; GR जारी, अंमलबजावणी केव्हापासून होणार? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com