Raigad News: सावधान! महाडच्या जंगलात वाघांचा वावर? गुराख्यांनी ऐकल्या धडकी भरवणाऱ्या डरकाळ्या; वन विभागाकडून सर्व्हेची गरज

Raigad Latest News: महाड तालुक्यातील तेलंगे या गाव परिसरातील जंगल भागात वाघाच्या डरकाळ्या ऐकायला येत आहेत. गुर चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याने या डरकाळ्या सुरु असताना जंगलात केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
 सावधान! महाडच्या जंगलात वाघांचा वावर? गुराख्यांनी ऐकल्या धडकी भरवणाऱ्या डरकाळ्या; वन विभागाकडून सर्व्हेची गरज
Raigad Latest News:Saamtv
Published On

सचिन कदम, रायगड|ता. २५ ऑगस्ट २०२४

प्राणी प्रेमी, निसर्गप्रेमींसाठी रायगडमधुन एक मोठी बातमी आहे. रायगडमध्ये आजपर्यंत बिबट्याचे अस्तित्व दिसून आले आहे मात्र आता रायगडमध्ये वाघांचा वावर असल्याचेही समोर आले आहे. महाड तालुक्यातील तेलंगे या गाव परिसरातील जंगल भागात वाघाच्या डरकाळ्या ऐकायला येत आहेत, ज्यामुळे वन विभागाकडून सर्व्हे करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

 सावधान! महाडच्या जंगलात वाघांचा वावर? गुराख्यांनी ऐकल्या धडकी भरवणाऱ्या डरकाळ्या; वन विभागाकडून सर्व्हेची गरज
Pune Helicopter Crash : बापरे! पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं; अपघाताचे थरारक Photos

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्राणी प्रेमी, निसर्ग प्रेमीं करता रायगडमधुन एक मोठी बातमी आहे. रायगडमध्ये आजपर्यंत बिबट्याचे अस्तित्व दिसून आले आहे मात्र आता रायगडमध्ये वाघाचे असल्याचे समोर येत आहे. महाड तालुक्यातील तेलंगे या गाव परिसरातील जंगल भागात वाघाच्या डरकाळ्या ऐकायला येत आहेत. गुर चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याने या डरकाळ्या सुरु असताना जंगलात केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा आवाज वाघाच्या डरकाळ्यांप्रमाणेच असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील म्हणणे आहे. महाडच्या खाडी पट्टयातील तेलंगे हे गाव रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या सिमेवर आहे. या भागात दाट जंगलही आहे तर दोन वर्षा पूर्वी याच भागाला जोडून असणाऱ्या गोरेगाव म्हसळा रस्त्यावरील शिर्के ताम्हाणे गावात काही तरुणांनी वाघ बघितल्याचेही सांगितले होते.

 सावधान! महाडच्या जंगलात वाघांचा वावर? गुराख्यांनी ऐकल्या धडकी भरवणाऱ्या डरकाळ्या; वन विभागाकडून सर्व्हेची गरज
Kalyan Politics : कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला

दरम्यान, वन विभागाकडे रायगड, रत्नागिरीमध्ये वाघ नसल्याची नोंद असली तरी या घटनांमुळे रायगड रत्नागिरी जोडणाऱ्या या जंगल भागात वाघांसाठी सर्व्हे होणे गरजेचे झाले आहे. याबाबत आता वन विभाग काय पाऊले उचलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 सावधान! महाडच्या जंगलात वाघांचा वावर? गुराख्यांनी ऐकल्या धडकी भरवणाऱ्या डरकाळ्या; वन विभागाकडून सर्व्हेची गरज
Kalyan Politics : कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com