Kalyan Politics : कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला

Kalyan Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याणमधील भाजपच्या बडा पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.
Indore Lok Sabha Constituency
BJP-Congress Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. कल्याणमध्ये काँग्रेसला भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. भाजपचा माजी पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीआधीच कल्याणमधील भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पातकर हे आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पातकर हे उद्या मुंबई टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे.

Indore Lok Sabha Constituency
Political News : महायुती सरकारला मोठा धक्का; सत्ताधाऱ्यांच्या १७ साखर कारखान्यांना कर्ज वितरणास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

राजाभाऊ पातकर यांची कशी आहे राजकीय कारकिर्द?

राजाभाऊ पातकर हे दहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात होते. 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये त्यांनी दहा वर्षे काम केले. जिल्हा सरचिटणीस, संपर्क प्रमुख आदी पदावर ते कार्यरत होते. मात्र भाजपची सध्याची ध्येय धोरणे पाहून तत्वाला पटत नसल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पातकर यांनी सांगितले.

Indore Lok Sabha Constituency
Political News : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले

काही दिवसांपूर्वी भाजपमधून राकेश मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मुथा देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते देखील स्वगृही परतले होते. आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याणमध्ये भाजपला एक मोठा धक्का आहे. यावेळी आणखी काही काँग्रेसमधून गेलेले नेते पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच भाजपामधील काही पदाधिकारी देखील काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com