Raigad Lok Sabha: मतदानासाठी घरातून निघाला, रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडला; महाडमध्ये मतदाराचा मृत्यू

Raigad Mahad Voter Death: महाडमध्ये मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर निघालेल्या एका मतदाराचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे.
Raigad Mahad Voter Death
Raigad Mahad Voter DeathSaam TV

सचिन कदम, साम टीव्ही

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील ११ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Raigad Mahad Voter Death
Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर निघालेल्या एका मतदाराचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. प्रकाश चिनकटे असे मृत मतदाराचे नाव आहे. ते महाड तालुक्यातील दाभेकर कोंड किंजळोली येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश चिनकटे हे मतदान करण्यासाठी मंगळवारी सकाळी घराबाहेर पडले होते. मतदान केंद्र अवघ्या १०० मीटर अंतरावर असताना चिनकटे हे रस्त्यातच कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सध्या रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. प्रकाश याचा नक्की मृत्यू कशाने झाला याबाबत माहिती कळलेली नाही आहे.

रायगडमध्ये ८ हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

दुसरीकडे, रायगडमध्ये तब्बल ८ हजार मतदारांनी मतदानावर बहिस्कार टाकल्याचं समोर आलंय. बाळगंगा प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांनी मतदान न करण्याचं ठरवलं आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.

परंतु, गावकऱ्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. रायगडमध्ये १३ वर्षांपूर्वी बाळगंगा धरणाचे काम सुरू झाले होते. काम ८० टक्के होऊनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.

Raigad Mahad Voter Death
Baramati News: मतदानाच्या दिवशीच अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात मारले दोन पक्षी, बारामतीत काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com