रायगड जिल्ह्यात सात तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Raigad School Holiday : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्‍याने आज आणि रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
RAIGAD RED ALERT: SCHOOLS AND ANGANWADIS CLOSED IN SEVEN TALUKAS AS HEAVY RAIN LOOMS
RAIGAD RED ALERT: SCHOOLS AND ANGANWADIS CLOSED IN SEVEN TALUKAS AS HEAVY RAIN LOOMS
Published On
Summary
  • हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.

  • शाळा व अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून रायगडला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्याना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

RAIGAD RED ALERT: SCHOOLS AND ANGANWADIS CLOSED IN SEVEN TALUKAS AS HEAVY RAIN LOOMS
सावधान, मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे ! अतिमुसळधार पावसाचा इशारा; महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी

रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी याबाबतचे परीपत्रक जारी केले आहे. मुसळधार पावसाची शक्‍यता लक्षात घेवून रायगड जिल्‍हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. हवामान खात्‍याने आज आणि रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले होते. अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली होती. तर इतर नद्यांच्या पातळीतही मोठी वाढ झाली होती. अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता.

विद्यार्थ्यांना सुट्टी मात्र शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश

शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. स्थानिक प्रशासनाने सोपविलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात आणि मदतकार्यात सर्वांनी पूर्ण सहकार्य करावे, असेही आदेशात सांगण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातीलही सर्व शाळांना सुट्टी

पालघर जिल्ह्यातीलही सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. उद्या गुरुवारी रोजी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय तसेच अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनि त्या प्रकारचा आदेश काढून सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com