Raigad Police Exam News: रायगड पोलीस भरतीत गैरप्रकार! कानात इलेक्ट्रिक चीप बसवून परीक्षा केंद्र गाठले, ६ कॉपी बहाद्दर ताब्यात

Raigad Police Recruitment Exam: हे ६ उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून लेखी परिक्षेला बसले होते. कॉपी रोखण्यासाठी हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला अन् तरुणांचा पर्दाफाश झाला.
Raigad Police Exam News: रायगड पोलीस भरतीत गैरप्रकार! कानात इलेक्ट्रिक चीप लावून परीक्षेस बसले, ६ कॉपी बहाद्दर ताब्यात
Police Recruitment ExamSaam tv
Published On

सचिन कदम, रायगड|ता. ११ ऑगस्ट २०२४

रायगड जिल्हा पोलीस दलासाठी झालेल्या भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. काल (शनिवार, १० ऑगस्ट) ही परीक्षा घेण्यात आली होती. या गैरप्रकार प्रकरणी 6 उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड पोलीस दलासाठी काल झालेल्या भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 6 उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे हे ६ उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून लेखी परिक्षेला बसले होते. कॉपी रोखण्यासाठी हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला अन् तरुणांचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणी रायगड पोलिसांनी 6 उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर डीव्हाइस वरून जे कुणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे. या बाबत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली आहे.

Raigad Police Exam News: रायगड पोलीस भरतीत गैरप्रकार! कानात इलेक्ट्रिक चीप लावून परीक्षेस बसले, ६ कॉपी बहाद्दर ताब्यात
Pune Traffic : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; या भागातील रस्ते राहणार बंद

रामदास जनार्दन ढवळे, दत्ता सुभाष ढेंबरे, ईश्वर रतन जाधव, गोरख गडदे, सागर धरमसिंग जोनवाल, शुभम बाबासाहेब कोरडे अशी पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या सर्वांवर गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस शिपाई पदाच्या 391 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आज अलिबाग आणि पेण येथे 11 केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 4 हजार 747 उमेदवार बसले होते.

Raigad Police Exam News: रायगड पोलीस भरतीत गैरप्रकार! कानात इलेक्ट्रिक चीप लावून परीक्षेस बसले, ६ कॉपी बहाद्दर ताब्यात
Jayant Patil News: 'एनडीए सरकार कधीही पडू शकतं, इंडिया आघाडी सत्तेत येणार', जयंत पाटलांचा सर्वात मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com