Raigad Breaking News : महाड MIDCतील कंपनीमध्ये भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

Mahad MIDC Blast: महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला.
Raigad News:
Raigad News:Saamtv
Published On

सचिन कदम, प्रतिनिधी

Raigad Breaking News:

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये या दुर्घटनेत चार कामगार दगावल्याचे सांगण्यात येत असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याचीही शक्यता आहे. (Raigad Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाड (Mahad MIDC) एमआयडीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये शुक्रवारी (3, नोव्हेंबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराला गॅसची लागण झाली असून चार जण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या मृत्यूंबाबत कंपनीने अधिकृत दुजोरा दिला नाही.

दुर्घटनेतील तीन जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रण आणण्याचे काम सुरू असून काही कामगार अडकल्याचीही भिती आहे. (Latest Marathi News)

Raigad News:
Dombivali News : डोंबिवलीतील मासे विक्री बंद; मासे विक्रेत्यांममधील वाद उफाळला, स्थानिक विक्रेत्यांचे आंदोलन

दरम्यान, पुणे शहरात ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना घडलीये. विद्यार्थिनी वसतिगृहात असतानाच ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raigad News:
Raju Shetty Aakrosh Padyatra: राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com