Dombivali News : डोंबिवलीतील मासे विक्री बंद; मासे विक्रेत्यांममधील वाद उफाळला, स्थानिक विक्रेत्यांचे आंदोलन

Dombivali News : डोंबिवलीतील मासे विक्री बंद; मासे विक्रेत्यांममधील वाद उफाळला, स्थानिक विक्रेत्यांचे आंदोलन
Dombivali Fish Market
Dombivali Fish MarketSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: बाहेरील मासे विक्रेते डोंबिवलीत येऊन मासे विक्री करतात. यामुळे डोंबिवलीत (Dombivali) स्थानिक मासेविक्रेता आणि बाहेरून येणाऱ्या मासे विक्रेत्यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादामुळे स्थानिक विक्रेत्यांनी (Fish Market) आंदोलन केले असून आज सकाळी मासे विक्री बंद ठेवण्यात आली. (Maharashtra News)

Dombivali Fish Market
Raigad Breaking News : महाड MIDCतील कंपनीमध्ये भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

वसईहून मासे विक्रेते डोंबिवलीत येऊन मासे विक्री करतात. त्यामुळे स्थानिक मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून उपासमार सुरू असल्याचा आरोप डोंबिवलीतील स्थानिक मासे विक्रेत्यांनी केला. वसईहून डोंबिवलीत येणाऱ्या मासे विक्रेत्यांनी वसईलाच मासे विक्री करावी. त्यांनी डोंबिवलीत येऊ नये अशी मागणी स्थानिक मासे विक्रेत्या महिलांनी केली. तरी देखील वसईहून विक्रेते डोंबिवलीत येत असतात. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivali Fish Market
Beed News : ६ दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू; मोजक्याच बस मार्गस्थ

मच्छी मार्केट बंद

गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत असूनही काहीच तोडगा न निघाल्याने आज डोंबिवलीचे स्थानिक मासे विक्रेत्यांनी या निषेधार्थ डोंबिवलीतील मच्छी मार्केट बंद ठेवलं होतं. याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढण्यात येईल असे सांगितले. ऐन शुक्रवारी डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी मासे विक्री बंद केल्याने मासे खाणाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com