Raigad Accident News : अनियंत्रित गाडीची धडक; मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार

अनियंत्रित गाडीची धडक; मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार
Raigad Accident News
Raigad Accident NewsSaam tv
Published On

सचिन कदम 
रायगड
: मोटारसायकलला समोरून येत असलेल्या मालवाहू गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.  (Live Marathi News)

Raigad Accident News
KDMC News : रात्री स्थलांतर दिवसा पुन्हा टेकडीवर; घरांवर कारवाईबाबत महापालिकेचा इशारा

रायगड जिल्ह्यातील पोयनाड नागोठणे रस्त्यावर पिकअप टेंपो आणि मोपेड मोटरसायकल यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मोटर सायकलवरील दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे. आरती पाटील (वय ४०) आणि हिराचंद्र म्हात्रे (वय ५०) अशी मृतांची नाव आहेत. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.  

Raigad Accident News
Kalyan Crime News : दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा, हारसह दानपेटीतील रोकड लंपास

नियंत्रण सुटल्याने धडक 

आज दुपारी झालेल्या अपघातात पिकअप टेंपो चालक दिनेश परदेशी याचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे गाडी विरुद्ध बाजूला येत असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर मोटारसायकल दूरवर फेकली गेली. तर पिकअप गाडी देखील पलटी झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com