पंढरपूर, ता. ५ जुलै २०२४
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आषाढी वारीमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांना राहुल गांधी यांना वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार १४ जुलै रोजी राहुस गांधी हे वारीमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्या या वारीला आता भारतीय जनता पक्षाचा विरोध होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यंदा प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे.
"उभ्या आयुष्यात कधीही राहुल गांधींनी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. महाराष्ट्रातील आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी ते पालखी सोहळ्यात पायी चालणार असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो," असे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. याबाबात त्यांनी पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेऊन राहुल गांधीना विरोध केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वारीतील सहभागाला भाजप, शिवसेनेकडून मोठा विरोध पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी वारीमध्ये येत आहेत, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.