Lanja Nagar Panchayat News : काेकणात शिंदे गटाचा ठाकरे गटास दणका; आमदार राजन साळवींची चिंता वाढली (पाहा व्हिडिओ)

हा निर्णय आमदार राजन साळवींना मोठा धक्का मानला जात आहे.
lanja nagar panchayat news, purva mule, mla rajan salvi
lanja nagar panchayat news, purva mule, mla rajan salvisaam tv

Lanja Nagar Panchayat News : उद्धव ठाकरे गटाच्या (uddhav thackeray faction) लांजा नगरपंचायतीच्या (lanja nagarpanchayat) उपनगराध्यक्ष पुर्वा मुळे (purva mule) यांच्या विरोधात आज (साेमवार) 13 विरुद्ध 0 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. दरम्यान अविश्वास ठराव मंजूर होताच उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांनी आक्रमक हाेत शिंदे गट (eknath shinde faction) आणि नगराध्यक्षांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. (Breaking Marathi News)

lanja nagar panchayat news, purva mule, mla rajan salvi
Amboli Ghat Accident News : आंबोली घाटातील खाेल दरीत गाडी काेसळली; गाेव्याहून परतताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू

उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे (purva mule) यांना पदावरून हटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटाकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला हाेता. या अविश्वास ठरावावर आज (साेमवार) मतदान झाले. मुळे यांच्या विराेधात 13-0 ने ठराव मंजूर झाला. यामुळे काेकणातील राजकीय घडामाेडी पुन्हा एकदा तापणार असे चित्र निर्माण झाले आहे.

lanja nagar panchayat news, purva mule, mla rajan salvi
Tarkarli News : तारकर्ली समुद्रात मालवणातील 'सिद्ध प्रसाद' नौका बुडाली

नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील १४ नगरसेवकांना गटनेता म्हणुन पुर्वा मुळे यांना बजावला गेला हाेता व्हिप. शिंदे गटाचे पाच नगरसेवक, काॅग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपचे तीन नगरसेवक असे १२ नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी केलं विरोधात मुळेंच्या विराेधात मतदान.

यानंतर लांजा नगरपंचायतीच्या खाली शिवसेनेचा मोठा जमाव जमा झाला. या जमावाने नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com