Datta Gade : कशा आवळल्या दत्ता गाडेच्या मुसक्या? नराधम गाडेच्या अटकेचा भयंकर थरार; A to Z घटनाक्रम

Datta Gade Arrested A to Z Story : तब्बल 40 तास गाडेच्या अटकेचा थरार रंगला होता. तो नेमका कसा आणि गाडेच्या मुसक्या कशा आवळल्या? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
 Datta Gade was arrested A to Z Story
Datta Gade was arrested A to Z StorySaam TV News
Published On

पुणे : राज्याला हादरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या तब्बल ४० तासांनंतर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. दत्ता गाडेच्या गुनाट गावातूनच ग्रामस्थांच्या मदतीने दत्ता गाडेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र तब्बल ४० तास गाडेच्या अटकेचा थरार कसा रंगला होता? पाहूयात.

कशा आवळल्या गाडेच्या मुसक्या?

25 फेब्रुवारी

सकाळी 10

अत्याचारानंतर गाडे गुनाट गावी

सायं. 5.30

गुनाट गावात गाडेचा घरीच आराम

रात्री 8.30 वा.

घरात पाणी पिऊन ऊसाच्या शेतात मुक्काम

26 फेब्रुवारी

सकाळी 6 वा. पोलीस गुनाट गावात

27 फेब्रुवारी

दुपारी 12 वा.

पोलिसांच्या 13 पथकांकडून गुनाट गावात शोध

दु. 1 वा.

ड्रोन कॅमेरा आणि श्वान पथकाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन

दु. 4 वा

100 पोलिसांचं पथक गुनाट गावात दाखल

सायं. 5

ग्रामस्थ आणि पोलिसांकडून ऊसाच्या शेतात गाडेचा शोध

सायं. 7

बिबट्याच्या भीतीने पोलिसांकडून सर्च ऑपरेशनला स्थगिती

रात्री 11.30

गाडेची नातेवाईकाच्या घरी येऊन सरेंडर करण्याची इच्छा

मध्यरात्री 1.30

ग्रामस्थांनी गाडेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं

मध्यरात्री 1.45

दत्ता गाडेला घेऊन पोलीस पुण्याकडे रवाना

 Datta Gade was arrested A to Z Story
Swargate Case Hearing : दोघांमध्ये सहमतीने संबंध; स्वारगेट घटनेतील आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद

दरम्यान, गाडेला अटक करण्यास उशीर झाल्याची कबुली देतानाच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्नही केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय. दरम्यान, स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारानंतर नराधम गाडेच्या मुसक्या आवळल्याने या संपूर्ण प्रकरणाची उकल होणार आहे. एवढंच नाही तर गाडेचे इतर काळे कारनामेही समोर येण्याची शक्यता आहे.

 Datta Gade was arrested A to Z Story
Namdeo Dhasal News : कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्यांवर गुन्हा नोंदवा; 'युवा पँथर' आक्रमक, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com