Namdeo Dhasal News : कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्यांवर गुन्हा नोंदवा; 'युवा पँथर' आक्रमक, काय आहे प्रकरण?

Namdeo Dhasal News in Marathi : सेन्सॉर बोर्डाने एका सिनेमाला दिलेल्या नोटिशीत कोण नामदेव ढसाळ, असा सवाल केल्याने युवा पँथरने आक्रमक भूमिका घेतली आहे. असा प्रश्न विचारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
Namdeo Dhasal News
Namdeo Dhasal Saam tv
Published On

सेन्सॉर बोर्डाच्या नोटिशीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा पँथर संघटनांनी केली आहे. सेन्सॉर बोर्डाविरोधात सोलापुरातील युवा पँथर संघटना आक्रमक झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

सोलापुरातील युवा पँथर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कोण नामदेव ढसाळ यांची माहिती देणारे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. नामदेव ढसाळ यांची जाणीवपूर्वक अवहेलना सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली.

Namdeo Dhasal News
Free Cinema : फ्रीमध्ये सिनेमा पाहायचा आहे का? या बँका देत आहेत मोफत तिकीट
Namdeo Dhasal News
Maharashtra Politics: योगेश कदमांनी केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकर संतापले, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

सेन्सॉर बोर्डाच्या नोटिशीवर युवा पँथरचे आतिष बनसोडे म्हणाले, 'चल हल्ला बोल' हा सिनेमा चळवळ आणि नामदेव ढसाळ यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चळवळीच्या सिनेमातील कवीला जागतिक स्तराचा मानसन्मान मिळाला आहे. साहित्य कला अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे'.

Namdeo Dhasal News
Top @ 10 AM : संजय देशमुख भगवान गडाकडे रवाना, बीडचे पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर, पंढरपूरात लगीन घाई.. वाचा महत्वाच्या हेडलाईन्स

'त्यांना कोण ढसाळ, असा सवाल केला आहे. सिनेमाला नोटीस दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. 'मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देऊन सातासमुद्र पार नेणारे नामदेव ढसाळ येथील सेन्सॉर बोर्डाला माहीत नसेल, तर त्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटलं.

Namdeo Dhasal News
Namdeo Shastri : समर्थकांसह नामदेव शास्त्री भगवान गडावर दाखल | Video

काय आहे प्रकरण?

सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी 'चल हल्ला बोल' चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये नामदेव ढसाळ कोण आहेत, आम्हाला माहीत नाही. नामदेव ढसाळांच्या कविता काढल्या तरच चित्रपटाला परवानगी मिळेल, अशी अट ठेवल्याने अनेक सामजिक संघटनांकडून संताप व्यक्त केला जातोय. यूए सर्टिफिकेटसाठी रिजेक्ट करण्यात आला आहे. या सिनेमाच्या A श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com