Datta Gade Wife : बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग माझा नवरा गेला; दत्ता गाडेच्या बायकोचा मोठा दावा

Datta Gade Wife Reaction : मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय. बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का?
 Datta Gade wife reaction
Datta Gade wife reactionSaam Tv News
Published On

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने या सर्व प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दत्ता गाडेची बायको नेमकं काय म्हणाली?

मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय. बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केलाय. त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्याचा दावा दत्ताच्या पत्नीने केलाय. तरुणीने आरडाओरड का केली नाही? असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरु आहे. या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.

 Datta Gade wife reaction
Pune Crime News: दुचाकी दुरूस्तीवरून वाद, गावगुंडांना बोलावून मॅनेजरला जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, नराधम आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवासी आहे. घरातील परिस्थिती हालाकीची आहे. गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे. त्याची वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेती काम करतात. तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे, पत्नी, लहान मुले देखील आहेत. असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे. तो कायम टुकारपणा करत फिरत असायचा. त्याला झटपट पैसे कमावायचा नाद लागला. त्या नादात त्याने चोरी, लुटमार करण्यास सुरुवात केली. महिलांना, वृध्दांना लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

 Datta Gade wife reaction
Pune Crime : पुणे महिला अत्याचाराचं माहेरघर, 40 दिवसांत 56 बलात्कार; छेडछाड, विनयभंगानं पुणं हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com