
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र हे कमी होतं की काय, पुण्यात धावत्या कारमध्ये आयटी कंपनीतील महिलेसमोर कॅब चालकाने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेसोबत कॅबमध्ये नेमकं काय घडलं? पाहूयात.
- 41 वर्षीय महिलेने अॅग्रीगेटर अॅपवरुन कॅब बूक केली
- गाडी संगमवाडीमार्गे पाटील इस्टेट भागात आल्यानंतर ड्रायव्हरने आरसा सेट केला
- ड्रायव्हरने आरशात महिलेला पाहून अश्लील चाळे सुरु केले
- सिग्नलला गाडी थांबताच घाबरलेल्या महिलेने पळ काढला
- जवळच असलेल्या खडकी पोलीसांत महिलेनं तक्रार दाखल केली
- कॅबचा ड्रायव्हर उत्तर प्रदेशचा असल्याचं स्पष्ट
स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार आणि कॅबमधील विनयभंग एवढंच नाही तर पुण्यात दररोज एकापेक्षा जास्त महिलांवर बलात्कार किंवा विनयभंग होत असल्याची चक्रावून टाकणारी आकडेवारी समोर आलीय.
पुणे महिला अत्याचाराचं माहेरघर
- 2023 मध्ये पुण्यात बलात्काराचे 410 तर 738 विनयभंगाच्या घटना
- 2024 मध्ये 505 बलात्कार तर 866 विनयभंगाचे प्रकार
- 2025 च्या सव्वा महिन्यात 56 बलात्कार तर 125 विनयभंगाच्या घटना
पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. गृहखातं हे लाडक्या बहीणींच्या सुरक्षेसाठी वापरण्याचा सल्ला राऊतांनी दिलाय. तर वडेट्टीवारांनी मात्र शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केलीय.
आधी बोपदेव घाटात तरुणीवर झालेला अत्याचार, त्यानंतर स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर झालेला बलात्कार या घटना सातत्याने घडत आहेत.. मात्र या प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत.त्यामुळे पोलीस ही विकृती ठेचण्यासाठी कधी पोलिसी खाक्या दाखवणार आणि या विकृतांच्या मुसक्या आवळणार? याकडे लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.