Ajit Pawar: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य! काल ६०० कार्यकर्त्यांनी साथ सोडली, आज खंद्या समर्थाकाने दंड थोपाटले, अजित पवारांना इशारा!

Dipak Mankar News: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. काल अजित पवार गटाने काही उमेदवारांची यादी जाहीर केली. यात दीपक मानकर यांचे नाव नसल्याने ते नाराज आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) वारे वाहू लागले आहेत.विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, अजित पवार गटात नाराजीनाट्य सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दीपक मानकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, २०१२ पासून मी संघटनेचं काम करत आहे.कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दादांकडे मागणी केली होती. मागणी होत असताना अनेक कार्यकर्ते भेटले.दादा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करतात,त्यावेळी दादा विचार करू, अस म्हणत होते. (Dipak Mankar News)

परवा तिकीट जाहीर झाले पण त्यात नाव नव्हतं. मी कुठे कमी पडलो, हे पक्ष पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं पाहिजं. नायकवडे आणि भुजबळ यांचं काय काम आहे मला माहित नाही. मी कधीही पार्टी कडून पैसे घेत नाही,पुढे पुढे करत नाही. कार्यकर्ता म्हणून सगळ्या जबाबदारी पार पाडणार आहे, परंतु तरीही सगळ्याचा विरोध मला पत्करावा करावा लागतो, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दीपक मानकर यांनी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही आरोप केले आहेत.'आमच्या प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जेवढी तत्परता रूपाली चाकणकरांचे बाबतीत दाखवली त्यांना पद वाढवून दिले तेवढी माझ्या बाबतीत का दाखवली नाही,असे आरोप त्यांनी तटकरे यांच्यावर केला आहे.

घराणेशाहीच राजकारण करत बसला तर कार्यकर्त्यांचं काय,भुजबळ यांच्या घरात दिलं,आम्ही लोकसभेत एकत्रित काम केलं. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष या पदाचा शनिवारपर्यंत राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Dipak Mankar News)

Ajit Pawar
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील डाव टाकणार! विधानसभेला लढायचं की पाडायचं, 'या' दिवशी होणार सर्वात मोठा निर्णय

माझं मत आहे की एक पद असावे अशी माझी मागणी आहे. सत्तेचं विक्रेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. रुपाली चाकणकर यांना आता काही पद देऊ नये. अनेक महिला राज्यात काम करतात. आमच्या भावना प्रांताध्यक्षांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. मी दादांसोबत आता फक्त कार्यकर्ता म्हणून काम करणार. मला अनेक ऑफरदेखील येत आहे. कार्यकर्त्यांनी ठरवलं तर निवडणुकीत फटका बसू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar
Maratha Aarakshan : एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देणार; जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, फडणवीसांना आव्हान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com