Junnar News
Junnar NewsSaam tv

Junnar News : गुलाल लावून कापलेले लिंबू फेकले रस्त्यावर; विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार

Junnar News : एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारांकडून अर्ज दाखल केल्यानंतर देवाला नारळ वाढवून प्रचाराला सुरवात करत आहेत.
Published on

जुन्नर (पुणे) : गुलाल लावून फोडलेले लिंबू रस्त्यावर फेकून देत जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर विधानसभा मतदारसंघात समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार आढळून आल्याने परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (Vidhan Sabha election) सुरु आहे. उमेदवारांकडून अर्ज दाखल केल्यानंतर देवाला नारळ वाढवून प्रचाराला सुरवात करत आहेत. मात्र जुन्नर (junnar) तालुक्यातील गोळेगाव फाटा, पांगरी माथा, ओतूर रोडवर गुलाल लावुन फोडलेले लिंबु रस्त्यावर आढळुन आले. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्नरमध्ये जादुटोना होत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र हा प्रकार का आणि कशासाठी? केला हे समजु शकले नाही.

Junnar News
Madha Vidhan sabha : माढ्यात तिरंगी लढत; महायुतीकडून मीनल साठे यांना उमेदवारी

जुन्नर तालुक्यात दुसऱ्यांदा घडला प्रकार 

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान आघोरी विद्येचा प्रकार घडला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. अर्थात निवडणुकीच्या कालावधीतच असे प्रकार होत असल्याचे समोर आल्याने लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत आघुरीविद्या, जादुटोनासारखे प्रकार होत असल्याने उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com