Pune Bangalore Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयानक अपघात; पोलिसासह तिघांचा जागीच मृत्यू

Pune Bangalore Accident: पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे -बेंगळुरु महामार्गावर चार चाकीला ट्रकला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे
Pune Bangalore Accident
Pune Bangalore AccidentSaam tv
Published On

संभाजी थोरात

pune bangalore accident News:

पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे -बेंगळुरु महामार्गावर चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतात कोल्हापूर पोलिसाचा देखील समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने अपघातस्थळी एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. चार चाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

Pune Bangalore Accident
Pune News: पुण्यात लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई; ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, ११ जणांची चौकशी सुरू

चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याने भयानक अपघात झालाय. साताऱ्यातील एक कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे.

पुणे बेंगळुरु महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन पोवार, भारती जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात एका कोल्हापुरातील पोलिसाचाही सामावेश आहे.

महामार्गावरील अपघातात मृत पोलीसासह त्यांची बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मृत नितीन पोवार हे कोल्हापूर पोलीस कर्मचारी आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत.

Pune Bangalore Accident
Ratnagiri Crime News: पैशांच्या मागणीला प्रियकर कंटाळला; प्रेयसीला जंगलात नेलं अन् कायमचा विषय संपवला, ३ महिन्यांनी हत्येचा उलगडा

पुण्यात सिमेंट ट्रक उलटला

दरम्यान, पुण्यातही अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील नवले चौकात अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवारी १०.२० च्या सुमारास झाल्याची घटना घडली आहे.

नवले चौकात सिमेंट ने भरलेला ट्रक दोन उलटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात कसा झाला?

नवले चौकात गतिरोधकाच्या ठिकाणी अचानक सिग्नल लागल्याने ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावलं. सिग्नलजवळ आल्यानंतर अचानक ब्रेक दाबल्यानंतर ट्रक हा एक चारचाकी आणि दुचाकीवर उलटला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com