Akola News: उच्चभ्रू सोसायटीत देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांची अचानक धाड; २ महिला अन् ३ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं

Akola Prostitution Racket: अकोला पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये हा व्यवसाय सुरू होता. २ महिला आणि ३ पुरूषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Akola News:  उच्चभ्रू सोसायटीत देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांची अचानक धाड; २ महिला अन् ३ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं
Akola Prostitution RacketSaam Tv
Published On
  • अकोल्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये सेक्स रॅकेट

  • पोलिसांनी धाड टाकत केली कारवाई

  • दोन महिला आणि तीन पुरुषांना नको त्या अवस्थेत पकडलं

  • एका नागरिकांच्या तक्रारीनंतर बनावट ग्राहक पाठवून कारवाई करण्यात आली

अक्षय गवळी, अकोला

अकोला पोलिसांनी मोठी कारवाई करत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. अकोल्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. रात्री उशिरा पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली. २ महिला आणि ३ पुरूषांना पोलिसांनी नको त्या अवस्थेत पकडलं. अकोला शहरातील सिव्हिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या देहविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी कुणी सहभागी आहे की नाही याचा पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका जागरुक नागरिकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. उच्चभ्रू सोसायटीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय चालवला जात होता. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत ही कारवाई केली. प्रति ग्राहकांकडून ५ हजार रुपये घेत या तरुणी आणि महिला देहविक्रीचा व्यवसाय करत होत्या. व्हॉट्सअ‍ॅपवर तरुणींचे फोटो पाठवून पूर्ण सौदे ठरायचे.

Akola News:  उच्चभ्रू सोसायटीत देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांची अचानक धाड; २ महिला अन् ३ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं
Akola Violence: अकोल्यात दोन गटात तणाव, दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; शेकडो जणांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जवळपास २ तास घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी होती. नागरिकांच्या सतर्कतेला सिव्हिल लाईन पोलिसांनी तत्पर प्रतिसाद देत कारवाई केल्याने स्थानिकांनी पोलिसांचे आभार मानले. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलिस करत आहेत.

Akola News:  उच्चभ्रू सोसायटीत देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांची अचानक धाड; २ महिला अन् ३ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं
Akola : अकोल्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या पथकाची गुटखा कारखान्यावर धाड; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com