राज्यात ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट; 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लुटीचा पर्दाफाश

Saam TV Sting Operation : सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात आहे. रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल झाल्याने प्रवाशांची अडचण वाढली आहे. पुण्यातील या प्रकाराचा साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमधून पर्दाफाश झाला आहे.
Saam TV Sting: Private Travels Accused Of Overcharging Passengers In Maharashtra
Saam TV Sting: Private Travels Accused Of Overcharging Passengers In Maharashtrasaam tv
Published On: 

सणासुदीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे दर वाढणं काही नवं नाही. रेल्वे, एसटीच्या बुकिंग फुल झाल्यानं लोकांना ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नसतो. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सवर कुठलाही अंकुश नसल्यानं प्रवाशांची लूटमार सुरू झालीये. अशातच पुण्यातील लुटीचा पर्दाफाश साम टिव्हीनं केलाय. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.

हे तिकीट दर ऐकल्यावर ते खाजगी बसचे आहेत की विमानांचे.असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण थांबा, हे दर खासगी बसेसचे आहेत. राज्यात सणासुदीच्या काळात रेल्वेबरोबरच खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक असते. याचाच गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या उचलत आहेत. विशेष म्हणजे, मनमानीपणे भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात आरटीओकडून विशेष तपासणी मोहीम सुरू असतानाही खाजगी बस कंपन्यांची बिनदिक्कतपणे लूट सुरूय. या लुटीचाच साम टिव्हीनं पर्दाफाश केलाय.

Saam TV Sting: Private Travels Accused Of Overcharging Passengers In Maharashtra
दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

जर तुम्हाला दिवाळीसाठी पुण्याहून नागपूरला जायंच असेल तर 4200 रुपये मोजावे लागताहेत. तर पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी नेहमीचा दर 1000 ते 1500 रुपये आहे. तसंच, पुण्याहून जळगावला जायंच असेल तर 1600 रुपये मोजावे लागताहेत. तर पुण्याहून जळगावला जाण्यासाठी नेहमीचा दर 900 ते 1000 रुपये इतका आहे.

Saam TV Sting: Private Travels Accused Of Overcharging Passengers In Maharashtra
ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

ऐन सणासुदीत रेल्वे बुकींग फूल झाल्यानं आता खासगी ट्रॅव्हल्स अव्वाच्या सव्वा दर आकारत प्रवाशांचं अक्षरशः दिवाळं काढतायंत... मात्र, हा प्रकार दिवाळीतच नाही तर प्रत्येक सणासुदीत होत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गरजेचा फायदा उचलणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यावर कधीतरी अंकुश लागणार का की आरटीओच्या नाकावर टिच्चून ही लूट अशीच सुरू राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.