Beed News : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; MPSCचा अभ्यास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Beed News : अक्षय आप्पासाहेब पवार (वय 24), असं मृत तरुणाचं नाव आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On: 

Beed News : सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या तरूणाने पेपर कठीण गेला म्हणून जीनवच संपवलं. बीडमधील या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.

एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. बीड शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय आप्पासाहेब पवार (वय 24), असं मृत तरुणाचं नाव आहे. अक्षय माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे राहत होता.  (Latest Marathi News)

Beed News
Nashik CCTV Footage: टोळक्याचा सोसायटीमध्ये घुसून तरुणावर जीवघेणा हल्ला, थरारक घटनेचा VIDEO आला समोर

अक्षय हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यासाठी तो बीड शहरातील नगर रोडवरील गणेशनगर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता. रविवारी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा दिली होती. परंतु अभ्यास करूनही पेपर अवघड गेल्याने तो चिंतीत होता.

पेपर अवघड गेल्याच्या टेन्शनमध्ये त्याने हे पाऊल उचलले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याप्रकरणी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com